125+ Marathi Ukhane For Pooja For Male & Female

Marathi Ukhane For Pooja For Bride & Groom│कोणतेही सण, शुभकार्य व पूजेसाठी मराठी उखाणे. 

लग्नानंतर नवरदेव व नवरी मुली ला अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी जेवावे लागते. घरामध्ये अनेक पूजा विधी होतात आणि अश्या पूजेच्या दिवशी नवरदेव व नावरी मुलीला मराठी उखाणे / Marathi Ukhane घ्यावे लागते. आम्ही तुमच्या साठी अश्याच पूजे साठी चे मराठी उखाणे / Marathi Ukhane For Pooja, Marathi Ukhane For Satyanarayan Pooja घेऊन आलो आहोत. आपण ह्या मराठी उखाण्या (Marathi Ukhane For Pooja) मधील कुठला हि साधा सोप्पं उखाणा पाठ करू शकता व अश्याच पूजे दिवशी म्हणू शकता.

Advertisements

माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा.
… नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.

अधिकमासात आईने दिली चांदिची

परात,
सखींनो २७ फेब्रुवारीला …. ची आली होती हत्तीवरुन वरात.

नारऴीपौर्णिमेला करतात नारऴीभात,
…सह फेरे खाल्ले सात…

………च्या पूजेला जाई-जुईच्या राशी,
…च नाव घेत हळदी-कुकवाच्या दिवशी.

हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
—रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.

सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा,
….. चे नाव घेते आज आहे दसरा.

काचेच्या बशित बदामचा हलवा
…….रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा.

माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला राखी बांधुन करते भावाची आरती,
….. ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती.

कपात दुध दुधावर साय
—— च नाव घेते —-ची माय

मंथरेमूळे घडले रामायण,
….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘ ,
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी
….रावाची आहे मी अर्धागीनी

उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव,
आज आहे मंगळागॉरी ….. चे घेते मी नाव.

वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,
….. चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते

हरतालिकेला सुहासिनी करतात महादेवाची पुजा,
….. च्या सहवासात खरी माझी मजा

जीवाभावाची ओवी आळवीन संसाराच्या प्रातःकाली,
….च्या नावावर ठरले मी आज भाग्यशाली

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
… च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रुप, रुपसारखा जोडा…..
,…..चे नाव घेते वाट माझी सोडा

धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा.

धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,
….. च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते

पुण्यकर्म केले असता राहतात जन्मोजन्मीच्या गाठी,
… चे नाव घेऊन जाते मी ग़ौरीहर पुजनासाठी 

नवरातत्रीनंतर येतोय दसरा,
…..चा चेहरा नेहमी असतो हसरा.

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
….. चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.

हिरव्या हिरव्या मेंदिचा रंग चढलाय लाल लाल,
आज आहे धुलिवंदन …. उडवतात रंग नि गुलाल.

चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती
…रावाच नाव घेते …च्या राती

अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले,
…. सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).

काव्य आनि कविता सागर आणि सरिता
…चे नाव घेते तुमच्या करिता

आज आहे श्रावणी पोळा,
….. च्या जीवावर शृंगार केले सोळा.

Marathi Ukhane For Satyanarayan Pooja   

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
….. चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.

भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन,
….ना करीते मी रोजच वंदन.

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
…. च्या जीवावर कर्ते मी मजा.

अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी
स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी

साँजवात लावताना येते माहेरची आठवण
— रावांसाठी झाली सासरी पाठवण.

हरतालिकेनंतर येते गणेशचतुर्थी,
….. आहेत फार निस्वार्थी

मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण,
…ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन.

कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
….. आहेत माझे पूर्व संचित

वाल्मिकी ऋषीने रचले रामायण,
….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
….. चे नाव घेऊन घेते मी रजा.

श्रीक़ष्णाने लिहिली भगवतगीता
……माझे राम तर मी त्यांची सीता

अश्वीन प्रतिपदेला देवीचे बसता घट,
….. नी आमलाय माझ्याकरिता सोंगतट्यांचा पट.

जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने
—- चे नाव घेते पत्नि या नात्याने.

नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी
तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित …… च्या अंगणी

Beautiful Marathi Ukhane For Satyanarayan Pooja For Husband & Wife.

श्रावण महिन्यात वाजतगाजत येतात गौरी गणपती,
….चे नाव घेते ते आहेत माझे प्रेमऴपती.

हुमायुनला राखी देउन कर्मावतीची भारतीय इतिहासात अमर झाली बंधुप्रिती,
हैदरभाईंना राखी बांधुनी ….. ची व माझी सफल झाली जीवन ज्योती.

जागतिक शांतिचे प्रतिक आहे कबुतर,
…. च्या सह शांतीने संसार करण्या पुजिते मी गॉरीहर.

नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
…..नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी

श्रावणात आकाशात, कडकडतात विजा…
__रावांसोबत करते, __ची पूजा

श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती…
__रावांच्या संसारात, मिळो सुखशांती भर श्रावणात,

पाऊस आला जोरात…
__रावांचे नाव घेते, __च्या घरात

श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा…
__रावांमुळे फुलला, संसाराचा फुलोरा

श्रावणात येई, पावसाला जोर…
__राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर

श्रावणात बरसतात, सरींवर सरी…
__ रावांचे नाव घेते __ ही बावरी

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी…
__ रावांचे नाव घेते, __च्या वेळी

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी…
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__च्या __ला, आली खूपच धमाल…
__रावांच्या कल्पकतेची, आहे सगळी कमाल

भरजरी साडी, जरतारी खण…
__रावांचे नाव घेते, आहे__चा सण

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी…
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__च्या दिवशी, दारावर बांधले तोरण…
__रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?

उगवला सूर्य, मावळला शशी …
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__ची आरास, सर्वांना पडली पसंत…
__रावांमुळे फुलला, जीवनी वसंत

__च्या दिवशी दरवळे, वाळ्याचे अत्तर…
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमीच तत्पर

__पुढे मांडले, प्रसादाचे ताट…
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट

__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी…
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी

__च्या समोर, ठेवले केशरी पेढे…
__रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?

__च्या पुढे, फुलांचे सडे…
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!

__पुढे लावली, समईची जोडी…
__ मुळे आली, आयुष्याला गोडी

__ची पूजा, मनोभावे करते…
__रावांसाठी, दीर्घायुष्य मागते

__समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी …
__ रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

आला आला __चा, सण हा मोठा…
__राव असताना, नाही आनंदाला तोटा

मोत्यांची माळ, सोन्याचा साज…
__ रावांचे नाव घेते, __ आहे आज

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी…
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

 हिरवागार दुर्वा रानोमाळी उगवला
***च्या साठी मंगळागौर जागवल्या

सौभाग्याची जीवन ज्योत प्रीत तेलाने ठेवते
****च दीर्घायुष मंगळागौरीला मागते

सत्यवान सावित्री ची जोडी, विश्व विख्यात ठरली,
******** साठी आज, वटपूजेला निघाली,

शिवासाठी पार्वतीने, तपस्या उग्र केली,
***** मात्र मला , पाहताक्षणी पसंती दिली,

Top Collection of Marathi Ukhane For Pooja After Marriage 

शिव-पार्वतीच्या सारीपाट, जसा उत्तोरोतर रंगला,
तसाच ******* चा रंगेल, संसार खूप चांगला,

शिव प्राप्तीसाठी पार्वतीने, कठोर वर्त केले,
पूर्वपुण्याइने ***** मला, पती म्हणून लाभले,

वाती विना पणती,ज्योती विना वाट खुलून दिसत नाही,
********* रावाशिवाय मला, मुळीच कर्मात नाही,

वटसावित्रीच्या जागरणाला, जोशात रंग भरला,
*****ची आठवण होताच, जीव माझा व्याकुळला,

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
……… च्या जीवावर कर्ते मी मजा.

महाराष्ट्राची  परंपरा  मंगळागौरीचा खेळ
***नाव घेते झाली पहाटेची वेळ

मंगळागौरीच्या जागरण, झिम्मा-फुगाडीने रंगले,
***** च्या सुखासाठी, मंगलागौर पुजते,,,

भिल्नीच्या रुपात शंकरापुढे आली गिरजा
***च्या सौभाग्यासाठी केली मंगळागौरीची पूजा

भारतमातेच्या पूजेला स्वदेशप्रेमाची पत्री
***रावांच नाव घेते मंगळागौरीच्या रात्री

भाद्रपदेच्या तृतीयाला हरतालिका पुजते,
****** च्या सुखी संसाराचे, वरदान पार्वतीकडे मागते,

पावसाच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती
***चे नाव घेते मंगळागौरीची राती

पहिल्या वर्षी वटपूजा, थाटामाटात केली,
रूप पाहून माझे,***** स्वारी खुश झाली,

नेवेद्याने चांदीचे ताट, रांगोळीने खुलले,
******* च्या संसारात, भाग्य माझे फुलले,

दारावर लावले लोकरीचे तोरण
***चे नाव घेते’ मंगळागौरीचे कारण’

झिम्मा खेळून फुगडी घालून, खूप बाई दमले,
जागरण संपताच मन, ****** कडे धावू लागले,

Marathi Ukhane For Pooja

Advertisements

चौरंगावर हरतालिकेची, पूजा रेखीव मांडली,
पाहताच ****** नि पाटीवर, शाबासकी दिली,

चांदीच्या ताटात ठेवेले पेढे
***चे नाव घेते मंगळागौरीच्या पुढे

घरात भरल्या अठरा धनाच्या राशी
***च नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

केळीच्या पानांनी, सप्तरंगी फुलांनी, मंगलागौर सजली,
****** च्या संसारात, ******* धन्य झाली…

कुबेराच्या घरी सोन्या चांदीच्या राशी
***नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

उत्तररात्री शिव-पार्वती, कैलासाला निघतील,
******* च्या सौख्याचे, वरदान मला देतील,

आंब्याच्या वनात’ कोकिळेचे गुंजन
***चे नाव घेऊन’ करते मी मंगळागौरीचे पूजन

अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी
xxxxxx स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी”

अंगणी रांगोळी, दरी पणती, आकाश कंदील शोभला,
भाग्य माझे थोर म्हणून, ******* सारखा साथी लाभला,

****** ला तेल लावून, कंबर माझी मोडली,
पाडव्याची पाहताच ओवाळणी, कळी माझी खुलती, 

मांडवाच्या दारी केळीचे तोरण
***नाव घेते मंगळागौरीचे कारण  

विवेकानंदाचे स्मरक कन्याकुमारीच्या सीमेवर
***चे नाव घेते मंगळागौरीच्या वेळेवर

पौर्णिमेला आज, वटपूजा मांडू दे,
****** पती म्हणून सप्तपदी लाभू दे,

दिन दुबळ्याचे गहाणे परमेश्वराने ऐकावे
…….. रावानं सारखे पती मिळाले आणखी काय मागावे

सुंदर माझे घर त्यात …….. रावांचा मधुर स्वर
दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.

सत्यावनासाठी सवित्रिने यमाचा पुरविला पिच्छा,
सात जन्म …….. राव माझे पति राहो हीच माझी इच्छा.

खाण तशी माती …….. राव माझे पती
आणि मी त्यांची सौभाग्यवती

गुलाबाचे फुल मधोमध असते पिवळे,
…….. राव दिसतात कृष्णा सारखे सावळे

येत होती जात होती, घडाळ्यात पाहत होती,
घडाळ्यात वाजले एक …….. रावांचे नाव घेते …….. ची लेक.

साजुक तुपाच्या करते पुरया, टाकते पाट करते ताट
…….. राव बसले जेवायला समया लावते तिनशे साठ

कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज,
…….. रावांचे नाव घेते, वटपोर्णिमा आहे आज.

लाल मणि तोडले काळे मणि जोडले
…….. रावांनसाठी आई वडिल सोडले

पीडयावर पीडे पाच पिडे
…….. रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुडे

ताटभर दगिन्यांपेक्षा माणस असावी घरभर,
…….. रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,
…….. राव गेले कामाला म्हणून मला नाही करमत

रंगीत कपाटात जापानी बाहुली,
…….. रावांना जन्म देणारी धन्य ती माउली

मुबई ते पुणे पेरला होता लसून,
…….. राव गेले थकून, आणा त्यांना पालाखित बसून.

खोक्यात खोका टिव्ही चा खोका,
गप्प बसा नाहीतर देईन ठोसा

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा,
…….. रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा

घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस,
…….. रावांच्या आयुष्यात चढवीन आनंदाचा कळस

केळीच्या पानांवर कोवळं कोवळे ऊन,
…….. रावांचे नाव घेते …….. ची सून.

कुंकू लावते लाल, त्यात पडला मोती,
…….. राव माझे पति मि त्यांची सौभाग्यवती.

अंगणातल्या तुळशीला घालते पळी पळी पाणी,
आधी होते आई वडीलांची तान्ही आता झाले…….. रावांची राणी

नदीला आला पूर समुद्राची झाली भरती
…….. राव बसले पलंगावरती मी करते त्यांची आरती

केळी देते सोलून पेरू देते चिरून,
…….. स्वामींच्या जिवावर कुंकू लावते कोरुन

परिजताकाच्या झाडा खाली हरिण घेतो विसावा,
…….. रावांच्या पाठीशी सदैव परमेश्वर असावा..

तुलसी माते तुलसी माते वन्दन करते तुला,
…….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहुदे मला.

नवरात्रित लावते अखंड दिवा
…….. रावांसाठी नेहमीच करत राहीन सेवा.

नवरात्रीच्या नऊ माळा, दहावी माळ म्हणजे दसरा
…….. रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा.

Final Note : मित्रांनो आपल्याला जर हे (Marathi Ukhane For Pooja) पूजेसाठी घेतले जाणारे मराठी उखाणे आवडले असतील तर आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कालवा आणि आपल्या मित्रां सोबत जास्तीत जास्त Share करा. जर आपल्याकडे अशेच भन्नाट Marathi Ukhane for Pooja असतील तर आम्हाला नक्की लिहून पाठवा.

Advertisements

Video

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top